क्रिकेटमधील नियमांनुसार, सुपर ओव्हरचा वापर हा फुटबॉलमधील ‘पेनल्टी शूटआऊट’ सारखा केला जातो. जेव्हा निर्धारित २० षटकांचा खेळ बरोबरीत सुटतो, तेव्हा केवळ विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली जाते. आयसीसीच्या (ICC) नियमावलीनुसार, सुपर ओव्हरमध्ये केलेल्या कामगिरीचा (धावा किंवा विकेट्स) समावेश खेळाडूच्या कारकिर्दीतील अधिकृत आकडेवारीमध्ये केला जात नाही.
\n\n\n\nRinku Singh with more brilliance tonight 🫴🫡
\n📸 👉 A fantastic catch at the boundary to send back Aiden Markram 👏
\nUpdates ▶️ https://t.co/elFxwvCeWO#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvKKR pic.twitter.com/OP5lihi9nu
\n— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2026
\nटी-२० क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाला जास्तीत जास्त ४ षटके टाकण्याची मर्यादा असते. सुपर ओव्हरमधील षटक हे गोलंदाजाचे ‘अतिरिक्त’ षटक ठरते. तसेच फलंदाजालाही दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळते. जर या धावा आणि विकेट्स अधिकृत आकडेवारीत मोजल्या, तर ज्या खेळाडूंना सुपर ओव्हर खेळायला मिळाली नाही, त्यांच्यावर तो अन्याय ठरेल. ही असमानता टाळण्यासाठी आणि क्रिकेटमध्ये समानता राखण्यासाठी सुपर ओव्हरमधील आकडेवारी खेळाडूच्या मुख्य प्रोफाईलमध्ये जोडली जात नाही. त्यामुळेच नरेन आणि रिंकूने सामना जिंकून दिला असला, तरी त्यांच्या ‘स्टॅट्स’मध्ये कोणताही बदल झालेला नाही.