पावसाळ्यात वीज चमकताना मोबाईल का बंद ठेवावा? जाणून घ्या –

मुंबई : राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. यादरम्यान, वीज पडून जीवीतहानी झाल्याच्या घटना देखील काही ठिकाणी घडल्या आहेत. दरम्यान, विजांचा कडकडाट सुरु असताना मोबाईल फोनचा वापर करु नये, असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते. यामागचे कारण काय आहे, हे जाणून घेऊया..
पावसाळ्यात विजांचा कडकडाट सुरु असताना विद्युत उपकरणे बंद केली जातात. तसेच मोबाईल फोनचा देखील वापर करण्यास मनाई केली जाते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आपण मोबाईल वापरत असताना त्यातून अतिनील किरणे वेगाने उत्सर्जित होत असतात. अतिनील किरणे विजेला स्वत:कडे आकर्षित करतात. एका वैद्यकीय जर्नलमध्ये याविषयीची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
बहुतेक वेळा लोक पावसात मोबाईल फोन वापरत असताना त्यांच्यावर वीज कोसळल्याचे समोर आले आहे. यामुळेच जेव्हा वीज चमकते, तेव्हा मोबाईल फोन बंद ठेवावा, असे सांगितले जाते. तसेच मोकळ्या आकाशात मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली जाते. येथे विज अंगावर कोसळण्याचा जास्त धोका असतो.
तसेच, विजांचा कडकडाट सुरु असताना घरातही टीव्ही, फ्रीज, कुलर, स्मार्ट टीव्ही अशी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळावे आणि ती बंद ठेवावीत. याशिवाय लॅपटॉप विजेलाही आकर्षित करतो, त्यामुळे पावसाळ्यात टिन शेडखाली बसून मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळावा. तसेच या पावसाळ्यात विद्युत खांब देखील कंडक्टर म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात, कोणत्याही वायरला जोडलेल्या आणि त्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहण्यास सांगितले जाते. अशी काळजी घेतल्यास विजेचा धोका काही प्रमाणात कमी होतो.





