छत्रपती संभाजीराजे भाजपावर ऐवढे नाराज का आहेत ? – दिपाली सय्यद

मुंबई – राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अखेर शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केल्याची बातमी देण्यात आली. संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ती फोल ठरली आहे. दरम्यान यावरूनच भाजप तसेच संभाजी राजेंच्या समर्थकांकडून टीका केली जात आहे. आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी या टीकेवर प्रतिउत्तर दिले आहे.
दिपाली सय्यद यांनी ट्विट केले आहे की,’छत्रपती संभाजीराजे भाजपावर ऐवढे नाराज का आहेत ? भाजपातुन बाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? भाजपा त्यांना थांबवून दुसरी जागा का देत नाही? फक्त निवडणुकी पुरता भाजपाला छत्रपती हवे होते का? याचे स्पष्टीकरण भाजपा ला द्यावेच लागणार!’असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
दिपाली सय्यद यांच ट्विट
छत्रपती संभाजीराजे भाजपावर ऐवढे नाराज का आहेत ? भाजपातुन बाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? भाजपा त्यांना थांबवून दुसरी जागा का देत नाही? फक्त निवडणुकी पुरता भाजपाला छत्रपती हवे होते का? याचे स्पष्टीकरण भाजपा ला द्यावेच लागणार! @bjpsamvad @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) May 25, 2022





