‘परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा’; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Eknath Shinde On Uddhav Thackeray| देशातील लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली आहे. 19 एप्रिलपासून सुरू झालेले लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता 1 जूनला शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेली शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी, दौरे, सभांचा धडाकाही आज संपणार आहे. महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पूर्ण झाले. यानंतर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी आहेत.
नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शेतातील फोटो शेअर करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी गावातील व्हिडिओ शेअर करत ‘परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा’ असे म्हणत उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी…लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला… pic.twitter.com/hD5NY0vYey
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 30, 2024
या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेतातील आंबा, फणसाच्या फळबागा, भाज्यांचे मळे तसेच पशुपालनाची पाहणी करत त्याची माहिती घेताना दिसत आहेत. “परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी,वसे जिथे विठूरायाची पंढरी,” असा सुंदर कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिला आहे. Eknath Shinde On Uddhav Thackeray|
पुढे त्यांनी लिहिले की, “लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला. यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते,” अशा भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी ते दरे या त्यांच्या मुळगावी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी गावातील सुंदर झलक व्हिडिओतून दाखवली आहे. Eknath Shinde On Uddhav Thackeray|
हेही वाचा :
“आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून…”; जयंत पाटील आव्हाडांच्या मदतीला सरसावले





