सरकारचं कोरोनावर का कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ?

मुंबई : कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या राज्यातील जिल्ह्यामध्ये सातत्याने वाढत आहे. सध्या राज्यात नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासोबतच संसर्ग वाढणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कोरोनासंदर्भातील नियमांची कठोर आणि परिणामकारक अंमलबजावणी लागू करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाने घेतले आहे. राज्यातील मराठवाडा , विर्भात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉक डाउन करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉक डाउन होणार का ? असा प्रश्न सतत चर्चेत येत आहे. याच मुद्यावरून मनसे नेते संदीप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे.
पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले,’तुमचे घाणेरडे प्रकरण बाहेर येतायेत म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राला लागून असलेले राज्य गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय ? सरकारचं कोरोनावर का कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ? असे सवाल मनसेने राज्य सरकारला विचारले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे कडक निर्बंध लावले जातायेत त्याला मनसे कडून विरोध केला जातोय. सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असे असताना मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचे दिसून आले आहे.





