अभिनेत्री राशा थडानीने पापाराझींसमोर मास्क का काढला नाही? फोटो काढण्यासही नकार; व्हिडीओ व्हायरल, कारण आले समोर

Rasha Thadani : सोशल मीडियावर अभिनेत्री राशा थडानीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. राशाने व्हिडीओत तोंडावर मास्क घातला आहे. पापाराझींनी विनंती करूनही तिने तोंडावरचा मास्क काढला नाही. यामुळे सोशल मीडियावर वेगवगेगळ्या चर्चा सुरू होत्या अशातच आता याचे कारण समोर आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री राशी थडानी मुंबई विमानतळावरून बाहेर येताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा जॉगर सूट परिधान केल्याचे दिसत आहे. याशिवाय राशाने मरून रंगाचा मास्क देखील तोंडावर घातला आहे. यावेळी पापाराझींनी अभिनेत्रीला प्रश्न विचारला आणि तिचे फोटो काढण्यासाठी तिला मास्क काढण्यास सांगितल्याचे दिसत आहे. यावेळी तिने मास्कर काढण्यासा नकार दिला.
पापाराझींच्या विनंतीवर अभिनेत्री म्हणाली की, तिची तब्येत अजिबात ठीक नाही, यावर पापाराझींनी तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीने त्यांचे आभार मानले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
View this post on Instagram
राशा थडानीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘आझाद’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात राशा थडानी, अजय देवगण, डायना पेंटी आदाी कलाकारांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फ्लॉप ठरला. मात्र, चित्रपटातील ‘उई अम्मा’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. याशिवाय अभिनेत्री कार्तिक आर्यनच्या पती, पत्नी और वो या चित्रपटातही दिसली होती.





