आपल्या सैनिकांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले ? ;राहुल गांधींचा सरकारला सवाल

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच चीनकडून करण्यात आलेल्या गोळीबारात देशाचे २० जवान शहिद झाले आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी, सैनिकांना सीमारेषेवर निःशस्त्र का पाठवण्यात आले असल्याचा आरोपवजा सवाल केला आहे.


राहुल गांधी यांनी एका माजी अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा उल्लेख करत ट्विट केले आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. चीनची एवढी हिम्मत का आणि कशामुळे झाली ? आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी निःशस्त्र का पाठवण्यात आले ? असे सवाल पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी विचारले आहेत.

या अगोदर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. या सर्व प्रकरणावर पंतप्रधान शांत का आहेत तसेच ते लपून का बसले आहे असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याच बरोबर त्यांनी, आपल्या जमिनीवर चीनकडून हक्क का दाखवण्यात येत आहे. आपल्या भागात घुसण्याची हिम्मत का होते या सर्व प्रश्नाची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावीत अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.