Jacqueline Fernandez : “तिचा हात का धरला?” जॅकलिन फर्नांडिसच्या बॉडीगार्डवर नेटकरी संतापले
Jacqueline Fernandez : काहींनी बॉडीगार्डचे समर्थनही केले

Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.
ती चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि फोटोसाठी पोझ देण्यासाठी थांबली होती, तेव्हाच तिच्या बॉडीगार्डने तिचे मनगट पकडले आणि तिला स्टेजच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी बॉडीगार्डच्या या वागणुकीवर टीका केली.
व्हिडिओमध्ये, अंगरक्षक जॅकलिन फर्नांडिसचे मनगट पकडून तिला स्टेजच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. असे वाटत होते की तो तिला फोटो काढायला थांबण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होता, पण जवळ जमलेले चाहते अभिनेत्रीसोबत फोटो काढण्यासाठी धडपड करत होते.
जॅकलीनने त्याला थांबण्याचा इशारा केला कारण तिला चाहत्यांशी संवाद साधायचा होता, सेल्फीसाठी पोझ द्यायची होती. पण तरीही त्या बॉडीगार्डने तिचा हात पकडून तिला रोखून धरले आणि तिला बाहेरनेले. (Jacqueline Fernandez)
या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत “खूप वाईट, बॉडीगार्ड जॅकलनिचा आदर करत नाही, असं दिसतं”, “जॅकलिनला हात न लावता तिला प्रोटेक्ट करायला हवं होतं”, “त्याने तिचा हात का धरला?” असे लिहिले आहे.
View this post on Instagram
तर काहींनी बॉडीगार्डची बाजू घेत, “कलाकार असं कोणालाही स्वत:ला हात लावू देत नाहीत. त्यामुळेच बॉडीगार्ड चाहत्यांना ढकलत आहे”, “सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवण्याचे त्यांना आदेश असतात”, असं काहींनी म्हटलं आहे. (Jacqueline Fernandez)
दरम्यान, जॅकलिन ‘वेलकम टू जंगल’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅकलिनसह या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त, अर्शद वारसी, राजपाल यादव, परेश रावळ, सुनील शेट्टी आणि तुषार कपूर यांच्यासोबतच रवीना टंडन, दिशा पटानी आणि लारा दत्ता यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २६ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. (Jacqueline Fernandez)
हेही वाचा:





