मुंबई- अभिनेत्री दीपिका पदूकोणने आपल्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या कारकिर्दीची सुरुवात ते आतापर्यंत तिने प्रत्येक भूमिका सचोटीने निभावल्या.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करून दीपिकाला अनेक वर्ष झाली आहेत. आजच्याच दिवशी तिचा पहिला चित्रपट ‘ओम शांती ओम’ रूपेरी पडद्यावर झळकला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होवून आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचा आनंद दीपिका साजरा करत आहे.
‘ओम शांती ओम’ या चित्रपटामुळे दीपिकाच्या करियरला चांगलीचं कलाटनी मिळाली. या चित्रपटामध्ये तिने अभिनेता शाहरूख खान सोबत स्क्रिन शेअर केली. तेव्हा या जोडीला चाहत्यांनी चांगलेचं डोक्यावर घेतले होते. शिवाय प्रेम कथेवर आधारलेल्या चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांनी पसंती दर्शवली.