Satya Movie : कॉस्च्युम डिझायनर मनीष मल्होत्रा उर्मिला मातोंडकरवर का ओरडला; अभिनेत्रीने सांगितल कारण म्हणाली

सत्या सिनेमा रिलीज होऊन तब्बल २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सत्यामधील कलाकारांनी एकत्रित येत सिनेमातील गंमती जमती शेअर करीत पुन्हा एकदा आठवणींना उजाळा दिला. सत्या चित्रपटगृहात रि-रीलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या स्क्रीनिंगपूर्वी सिनेमातील कलाकार एकत्रित आले होते. या सिनेमातील अभिनेत्री उर्मिलाने त्यावेळची एक आठवण सांगितली. जेव्हा कॉस्च्युम डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी सत्या सिनेमात परिधान केलेल्या साड्यांची किंमत उघड केल्याबद्दल तिच्यावर ओरडले होते. रेडिओ नशा दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्मिलाने ही आठवण सांगितली.
त्याकाळात अभिनेत्री उर्मिला मातोडकरने मोठी प्रसिद्ध मिळवली होती. एक प्रकारचे ग्लॅमर तिच्या भोवती तयार झालं होतं. सत्या सिनेमातील उर्मिलाचा लूक सिंपल पण लक्षवेधी ठरला होता. तिने या सिनेमात परिधान केलेल्या साड्यांची मोठी चर्चा त्यावेळी झाली. आताही हा सिनेमा पाहिल्यानंतर सत्यामधील उर्मिलाच्या साड्यांबद्दल चर्चा होत असते. साड्यांची किंमती उर्मिलाने फोनवरून सांगितल्याने मनीष माझ्यावर ओरडला असल्याचे तिने सांगितले.
तुमने ५०० रुपये क्यो बोला
रंगीला नंतर मनीषा मल्होत्रा सत्यासाठी साड्या विकत घेत होतो. इथे आम्ही डोकं फोडून या स्वस्तातल्या साड्या विकत घेत होतो. तर एकदा, एका मुलाखती दरम्यान मला कोणीतरी माझ्या लूकबद्दल काहीतरी विचारले… आणि मी त्यावेळी म्हणाले होते, ‘यार, तुम्ही सर्वजण माझ्या लूकचे इतके वेड का आहात? मी 500 रुपये किंमतीची साडी नेसली आहे. त्यानंतर अचानक एक दिवस मला फोन आला… त्याकाळी मोबाईल फारसे नव्हते. तो फोन होतो मनीषचा तो माझ्यावर ओरडला, ‘तुमने ५०० रुपये का साडी क्यू बोला? असे तो म्हणाला. यावर मी त्याला म्हणाले मी फक्त असेच म्हणाले. मला वाटतं तो चुकला. पण, आज त्याला आनंद झाला असेल ठीक आहे.
याच मुलाखतीत उर्मिलाने तिची सर्वात मोठी खंतही बोलून दाखविली. दिग्गज गायक लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यावर नाचायचे आहे हे समजल्यावर तिला खूप आनंद झाला, पण निर्मात्यांनी चित्रपटातील काही भाग कापल्यानंतर तिची निराशा झाल्याचे तिने सांगितले. असे एक ना अनेक किस्से यावेळी सिनेमातील इतर कलाकारांनी देखील सांगितले.





