inflation: इंधन, वीज आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे एप्रिल महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर (WPI) आधारित महागाई दर झपाट्याने वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला. मार्चमध्ये हा दर ३.८८ टक्के होता. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली. इंधन आणि वीज गटातील महागाई दर एप्रिलमध्ये २४.७१ टक्क्यांवर गेला असून मार्चमध्ये तो केवळ १.०५ टक्के होता. कच्चे पेट्रोलियम क्षेत्रातील महागाई ८८.०६ टक्क्यांवर पोहोचली असून मागील महिन्यात ती ५१.५ टक्के होती. ( inflation) पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील प्रभावी नाकेबंदीमुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. त्याचा थेट परिणाम घाऊक महागाईवर झाल्याचे मानले जात आहे. हेही वाचा – डॉलरसमोर रुपया पुन्हा गडगडला; इतिहासातील नीचांकी पातळीवर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणे अन्नधान्य गटातील महागाई दर एप्रिलमध्ये १.९८ टक्के राहिला, जो मार्चमध्ये १.९० टक्के होता. बिगर-अन्न वस्तूंमधील महागाई १२.१८ टक्क्यांवर गेली असून मार्चमध्ये ती ११.५ टक्के होती. मंत्रालयाने म्हटले आहे की, खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, अन्य उत्पादन क्षेत्रे आणि बिगर-अन्न वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे एप्रिलमधील महागाई दरात वाढ झाली आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये महागाईत मोठी वाढ – (inflation) एलपीजीमधील महागाई दर एप्रिलमध्ये १०.९२ टक्के राहिला, जो मार्चमध्ये उणे १.५४ टक्के होता. पेट्रोलमधील महागाई ३२.४० टक्के झाली असून मागील महिन्यात ती २.५० टक्के होती. उच्चगती डिझेलमधील महागाई दर २५.१९ टक्क्यांवर पोहोचला असून मार्चमध्ये तो ३.२६ टक्के होता. inflation: भारतात महागाईचा विस्फोट; एप्रिल महिन्यातील महागाई दर झपाट्याने वाढून पोहोचला 8.30 टक्क्यांवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे ५० टक्क्यांची वाढ झाली असली, तरी सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजीच्या किरकोळ दरांमध्ये अद्याप वाढ केलेली नाही. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत.