Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अखेर 84 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. यानंतर मुंडेंच्या जागी कोणाला संधी मिळणार? यावर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यादरम्यान एक माहिती समोर आली आहे. ते म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार तुर्तास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अन्न व नागरी पुरवठा विभागासंबंधीच्या प्रश्नांना आता ते सभागृहात उत्तर देतील. अजित पवार यांच्याकडे सध्या अर्थ आणि उत्पादन शुल्क खात्याचा कारभार आहे. यामध्ये आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निमित्ताने तिसऱ्या खात्याची भर पडली आहे. मात्र काही काळापूरताच ते या विभागाचा कारभार पाहणार आहे. Dhananjay Munde | वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी केज कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हाच देशमुख हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी खंडणी प्रकरणातूनच देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील अंगावर काटा आणणारे फोटो सोमवारी व्हायरल झाले होते. धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अखेर मंगळवारी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हेही वाचा: चीन अमेरिकेला म्हणाले,’…तर युद्ध करा’ ; “आम्ही नेहमीच तयार” म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा पलटवार