लोणी काळभोर, (वार्ताहर) – विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी होणा-या शिरूर- हवेली मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) उमेदवार म्हणून विद्यमान आमदार अशोक पवार यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र महायुतीकडून अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्ञानेश्वर कटके यांची उमेदवारी शुक्रवारी (दि. 25) जाहीर करण्यात आली आहे. महायुतीला उमेदवार जाहीर करण्यास झालेला उशीर हा आगामी काळात निर्णायक ठरू शकता. दरम्यान, या मतदारसंघात कोणाची दादागिरी चालणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पहाणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या 1962 ते 2019 पर्यंतच्या 13 विधानसभा निवडणुकांपैकी 6 वेळा काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. 3 वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा, 2 वेळा भाजपचा तर जनता पक्ष व प्रजा सोशलिस्ट पार्टी यांचा प्रत्येकी एकदा उमेदवार निवडून आला आहे. या 13 निवडणुकीत सर्वात मोठा विजय 2019 साली विद्यमान आमदार अशोक पवार यांनी 41504 मताधिक्याने मिळवला होता. सर्वात छोटा विजय काँग्रेसचे उमेदवार पोपटराव गावडे यांनी 1995 च्या निवडणुकीत मिळवला होता. त्यांनी अपक्ष उमेदवार बाबूराव पाचर्णे यांचा 678 मतांनी पराभव केला होता. वर्ष, आमदार व पक्ष 1962 – रावसाहेब पवार (काँग्रेस) 1967 – शामकांत मोरे (प्रजा सोशलिस्ट पार्टी) 1972 – पोपटराव कोकरे (काँग्रेस) 1978 – बाबुराव दौंडकर (जनता पक्ष) 1980 – सूर्यकांत पलांडे (काँग्रेस) 1985 व 1990 – बापूसाहेब थिटे(काँग्रेस) 1995 – पोपटराव गावडे (काँग्रेस) 1999 – पोपटराव गावडे (राष्ट्रवादी) 2004 – बाबुराव पाचर्णे (भाजप) 2009 – अशोक पवार (राष्ट्रवादी) 2014 – बाबुराव पाचर्णे (भाजपा) 2019 – अशोक पवार (राष्ट्रवादी) 2019 2019 च्या निवडणुकीत शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात एकूण 384323 मतदार होते. यावेळी 67.31 टक्के मतदान झाले होते. एकूण वैध मतांची संख्या 258680 होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अशोक पवार एकूण 145131 मते मिळवून विजयी झाले होते. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबुराव पाचर्णे हे एकूण 103627 मतांसह दुसर्या क्रमांकावर होते. त्यांचा 41504 मतांनी पराभव झाला. 20214 2014 मध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण 310489 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 216218 होती. भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे एकूण 92579 मते मिळवून विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार 81638 मतांसह दुसर्या क्रमांकावर आहेत. त्यांचा 10941 मतांनी पराभव झाला. 2009 मध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण 285129 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 183270 होती. राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार एकूण 53936 मते मिळवून विजयी झाले होते. अपक्ष उमेदवार बाबुराव पाचर्णे हे एकूण 46369 मतांसह दुसर्या स्थानावर राहिले. त्यांचा 7567 मतांनी पराभव झाला. 2004 2004 मध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण एकूण वैध मतांची संख्या 143745 होती. या जागेवरून भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे एकूण 70601 मते मिळवून विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पोपटराव गावडे एकूण 61041 मतांसह दुसर्या क्रमांकावर राहिले. त्यांचा 9560 मतांनी पराभव झाला.1999 मध्ये एकूण 159388 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 101482 होती. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पोपटराव गावडे विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण 41957 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बाबुराव पाचर्णे एकूण 33930 मतांसह दुसर्या स्थानावर आहेत. त्यांचा 8027 मतांनी पराभव झाला. 1995 1995 मध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण 157352 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 119877 होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पोपटराव गावडे या जागेवरून विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण 36897 मते मिळाली. अपक्ष उमेदवार पाचर्णे बाबूराव काशिनाथ हे एकूण 36219 मते घेऊन दुसर्या स्थानावर राहिले. त्यांचा 678 मतांनी पराभव झाला. 1990 मध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण 147166 मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या 94040 होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब थिटे हे विजयी झाले. त्यांना एकूण 36499 मते मिळाली. जनता दलाचे उमेदवार संभाजीराव काकडे 26759 मतांसह दुसर्या क्रमांकावर राहिले. त्यांचा 9740 मतांनी पराभव झाला.