माणिकचंद कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश धारिवाल यांनी “ग्रीन गणेशा-2019′ या मोहिमेचे पालकत्व स्वीकारले आणि ही मोहीम “दै. प्रभात आयोजित, माणिकचंद प्रस्तुत ग्रीन गणेशा-2019′ या नावाने ओळखली गेली.
पुण्यातील बांधकाम व्यवसायातील अग्रणी कंपनी असलेल्या सिद्धीविनायक ग्रुपच्या राजेश सांकला यांचेही प्रायोजकत्व या मोहिमेला लाभले. बायोमेडिकल वेस्ट अर्थात जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रणी असलेल्या पास्को एन्व्हायर्मेंटल सोल्युशन्स प्रा. लि. चे सुनील दंडवते आणि प्रदीप मुळे यांचेही या मोहिमेला उत्तम सहकार्य लाभले.
महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लि. चे सीए हेमंत लोढा यांनीही प्रभातच्या पर्यावरण रक्षणासाठीच्या या मोहिमेत मोलाचा सहभाग नोंदवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लौकिक असलेल्या पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य या मोहिमेला देण्यात आले.
पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रण यासाठीच कार्यरत असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयानेही या मोहिमेत सहभागी व्हायचे मान्य केले.
पुणे महानगरपालिकेनेही ग्रीन गणेशा मोहिमेत सहभाग नोंदवला आणि महापौर मुक्ताताई टिळक, आयुक्त सौरभ राव यांच्यासह घनकचरा व्यवस्थापनचे उप आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनीही मोठे सहकार्य केले.