अभिनयासोबतच सारा अली खानला हॉलिडे एन्जॉय करायलाही खूप आवडते. सोशल मीडियावर साराने अनेक हॉलिडे अनुभवाचे फोटो व्हिडिओ शेअर केले आहे. नुकतीच ती तिच्या मैत्रिणी आणि आईसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसली. साराने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, परंतु त्यापैकी एका फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे बघून लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले.
शेअर केलेल्या अनेक फोटोंपैकी एका फोटोमध्ये सारा अली खान एका व्यक्तीसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहते करू लागले की, सारासोबत दिसणारा हा मुलगा कोण आहे? सारासोबत पूलमध्ये दिसलेली व्यक्ती जहां हांडा आहे, तो साराचा लेखक मित्र आहे. फोटोमध्ये दोघेही कुठल्यातरी विषयावर बोलत आहेत. दुसर्या फोटोमध्ये सारा पूलमध्ये एकटी दिसत आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकतीच सारा गॅसलाइट या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंगही दिसले होते. ती लवकरच ए वतन मेरे वतन या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.