Ram Mandir : अयोध्येत राम मंदिरात भगवान रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ऐतिहासिक क्षण, जेव्हा 500 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान श्री राम अयोध्येतील एका भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समुदाय आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत रामललाच्या श्रीविग्रहाचा अभिषेक पूर्ण झाला.
हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी नवरीसारखी सजवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत समाज आणि प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पूर्ण झाला आहे. यावेळी प्रभू श्रीरामाला पिवळ्या रंगाचे पितांबरात परिधान केले होते आणि त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण आहेत.
रामललाने सोन्याचे चिलखत, कानातले आणि हार घातला आहे. तसेच रत्नजडित मुकुट आणि त्यांच्या गळ्यात सुंदर रत्नांची माला आहे. प्रभू रामललाचा कमरबंदही सोन्याचा आहे. रामललाच्या दागिन्यांमध्ये रत्न, मोती आणि हिरे यांचा समावेश आहे. दरम्यान, यावेळी प्रभू श्रीरामाला खादी सिल्कचे वस्त्र परिधान करण्यात आले आहेत.
हे नवीन वस्त्र खादी आणि ग्रामोद्योग बोर्डाकडून डिझायनर मनीष त्रिपाठी यांनी तयार केले आहेत. मनीष यांनी रामललाचे वस्त्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांच्याकडे सोपवले. रामललाचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले की प्रभू श्रीरामाचे वस्त्र अगदी त्याच मापाने बनवण्यात आले आहेत, जसे अयोध्येमधील टेलर बनवायचे.
View this post on Instagram
मनीष त्रिपाठी यांनी बिझनेस, क्रीडा, राजकारण, बॉलिवूड या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसाठी कपडे डिझाइन केले आहेत. ‘कान्स फेस्टिव्हल’साठीही त्यांनी कपडे डिझाइन केले आहेत. सध्या ते भारतातील हातमाग आणि हस्तकला उद्योगांच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या अधिकाधिक प्रचारासाठी विणकर समुदायासोबत मिळून काम करत आहेत.
रामललाचे वस्त्र बनवण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वत:ला अत्यंत सौभाग्यवान समजत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. खादी कपड्यापासून त्यांनी हे वस्त्र बनवले आहेत. ड्रेस डिझायनर मनीष त्रिपाठी हे अयोध्येच्या शेजारी असलेल्या जनपद आंबेडकरनगर इथले राहणारे आहेत.