Suraj Chavan : बिग बॅास मराठी ५ मध्ये विजयी झाल्यानंतर सूरज चव्हाणला मोठी प्रसिद्ध मिळाली. तो आता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे. सुरुवातीला रिल स्टार म्हणून ओळखला जाणारा सूरज आता एखाद्या सेलिब्रिटींना प्रसिद्ध मिळते ती प्रसिद्धी त्याला मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सूरज एका कारणामुळे चर्चेत आहे. सूरजने त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत एक व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरून शेअर केला होता. पण त्या व्हिडीओत त्याने बायकोचा चेहरा दाखवला नव्हता. अखेर त्याच्या बायकोचा चेहरा आणि नाव समोर आले आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालवलकर हिने इंन्स्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने सूरज आणि त्याच्या बायकोला घरी केळवणासाठी आमंत्रित केले होते. लवकरच सूरज लग्नबंधनात अडणार असून चाहत्यांना त्याच्या लग्नाची उत्सुकता लागलेली आहे. View this post on Instagram A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl) व्हिडीओमध्ये सूरज आणि त्याच्या बायकोने खास उखाणा घेतला आहे. सूरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना आहे. सूरज आणि संजना दोघांनीही एकमेकांना गोड पदार्थ भरवला. या जोडीला पाहून चाहत्यांनी कमेंट्स आणि शुभेच्छांच्या वर्षाव केला आहे. सूरजच्या बायकोचा साधेपणाने सर्वांनाच भावला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अंकिताने सूरजच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. त्यावेळी तिने सोशल मीडियावर व्हिडीओ देखील शेअर केला होता. सूरज आणि संजना लग्न कधी करणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असून, डिसेंबर महिन्यात दोघे लग्न करणार असल्याची शक्यता आहे. यामुळे सूरजच्या लग्नाला कोणकोण उपस्थित राहणार? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. हेही वाचा : “एकनाथराव आणि मी कधीकधी अदलाबदल करतो कधी ते…”; CM फडणवीसांचं मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?