\n

मला भारतीय पत्रकारांचा फोन आला…

\n

हा वाद सुरू झाल्यानंतर, भारतीय पत्रकारांनी तिला फोन करायला सुरुवात केली. तिने सांगितले की एका पत्रकाराने ती जिथे काम करते त्या सलूनशी संपर्क साधला. “एका पत्रकाराने मला संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी, सलूनमध्ये जाण्याबद्दल, माझ्या कामाबद्दल जाणून घेण्यासाठी फोन केला… मुलाखतीसाठी माझ्याशी बोलायचे होते, पण मी प्रतिसाद दिला नाही.

\n

त्याने मला इंस्टाग्रामवर शोधले, त्याने मला इंस्टाग्रामवर फोन केला…” तिने सांगितले की हा फोटो फोटोग्राफर मैथियस फेरेरो यांनी काढला होता आणि ‘अनस्प्लॅश डॉटकॉम’ या रॉयल्टी-फ्री वेबसाइटवर अपलोड केला होता. सध्या तो फोटो त्या साइटवरून हटवण्यात आला आहे. असं देखील तिने सांगितलं आहे.

\n

माझा भारतीय राजकारणाशी संबंध नाही…

\n

लरिसा हिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली ओळख उघड केली. ती म्हणाली, “नमस्ते इंडिया, मला अनेक भारतीय पत्रकारांनी व्हिडिओ करण्यासाठी विनंती केली, म्हणून मी हे बोलत आहे. माझा भारताच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी कधीच भारतात आले नाही. मी तीच रहस्यमयी ब्राझिलियन महिला आहे. मी ती गूढ मॉडेल आहे, आता मी फक्त माझ्या मुलांच्या मागे वेळ घालवत आहे. भारतात जे होत आहे, ती मी नाही, तो फक्त माझा फोटो आहे. तुम्हाला वाटते का की मी भारतीय दिसते, मला वाटते मी मेक्सिकन सारखी दिसते, असे ती म्हणाली.

\n

सध्या ती मॉडेलिंगपासून दूर असली तरी, या वादामुळे तिला मिळत असलेल्या भारतीय प्रेमाबद्दल आणि सहानुभूतीबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे आपण भारतात फेमस झालो आहोत, यावर तिचा विश्वास बसत नाहीये. मतदार यादीतील घोटाळ्याचा तिच्यावर कोणताही परिणाम नाही, परंतु आपल्या छायाचित्राचा गैरवापर झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

\n

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? वाचा…

\n

बुधवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. “देशात सध्या ‘ऑपरेशन सरकार चोरी’ सुरू आहे. हरयाणामध्ये ब्राझिलियन मॉडेलचे मतदार कार्ड तयार होते आणि ती मॉडेल २२ ठिकाणी मतदान करते. हरयाणामध्ये जे घडले तेच आता बिहारमध्येही घडणार आहे. बिहारमधील मतदार याद्यांमध्येही घोटाळे झाले आहेत, असे ते म्हणाले.

\n

पुढे राहुल यांनी एका ब्राझिलियन मुलीचा फोटो दाखवत तिचे नाव हरयाणाच्या मतदार यादीत असल्याचा आरोप केला. “ही महिला गोवा किंवा महाराष्ट्रातील नसून ब्राझीलमधील मॉडेल आहे. तिच्या नावाने हरयाणात २२ वेळा मतदान करण्यात आले. कधी स्वीटी, कधी सीमा, तर कधी सरस्वती या नावाने तिने मतदान केले. या मॉडेलचे नाव मला माहित नाही, मात्र या महिलेचा फोटो मॅथियस फरेरा याने अनस्प्लॅश डॉटकॉमवर अपलोड केलेला होता. एका ब्राझिलियन मॉडेलचे नाव हरयाणाच्या मतदार यादीत कसे आले?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ वाली ‘ब्राझिलियन मॉडेल’ कोण? ‘Larissa Nery’ने स्वतः व्हिडिओ केला शेअर","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/digital-prabhat-15.png","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-the-brazilian-model-with-rahul-gandhis-hydrogen-bomb-larissa-nery-herself-shared-the-video#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/digital-prabhat-15.png","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-the-brazilian-model-with-rahul-gandhis-hydrogen-bomb-larissa-nery-herself-shared-the-video#webpage","name":"राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ वाली ‘ब्राझिलियन मॉडेल’ कोण? ‘Larissa Nery’ने स्वतः व्हिडिओ केला शेअर","url":"https://www.dainikprabhat.com/who-is-the-brazilian-model-with-rahul-gandhis-hydrogen-bomb-larissa-nery-herself-shared-the-video","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-the-brazilian-model-with-rahul-gandhis-hydrogen-bomb-larissa-nery-herself-shared-the-video#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/11/digital-prabhat-15.png","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-the-brazilian-model-with-rahul-gandhis-hydrogen-bomb-larissa-nery-herself-shared-the-video#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/who-is-the-brazilian-model-with-rahul-gandhis-hydrogen-bomb-larissa-nery-herself-shared-the-video","name":"राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ वाली ‘ब्राझिलियन मॉडेल’ कोण? ‘Larissa Nery’ने स्वतः व्हिडिओ केला शेअर"}}]}}}

राहुल गांधींच्या ‘हायड्रोजन बॉम्ब’ वाली ‘ब्राझिलियन मॉडेल’ कोण? ‘Larissa Nery’ने स्वतः व्हिडिओ केला शेअर