‘कोण आहे हा दाढीवाला म्हणत राज्य, देश नाही तर जगातील ३३ देशांनी मी केलेल्या बदलाची दखल घेतली’ – एकनाथ शिंदे

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला शिवसेनेतून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच शिंदे यांनी शिवसेनेचा आयकॉनिक दसरा मेळाव्यावर देखील आपला हक्क सांगत बेकीसी मैदानात मोठं शक्तिप्रदर्शन केलं.
उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व नाकारून शिंदे गटात गेलेले आमदार, खासदार, पदाधिकारी आज शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित होते. शिंदे यांनी, आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे व त्यांचं नेतृत्व मानणाऱ्या नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी ते बोलतांना म्हणाले,’मी अलीबाबा चाळीस चोर असा चित्रपट पहिला होता त्यांनी चोरी केली पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेतील वेगळ्या विचारांचे 40 आमदार पळवले. राज्यात ही घटना घडल्यानंतर सगळे म्हणायला लागले कोण आहे हा दाढीवाला त्यानंतर 33 देशांनी या माणसाची दखल घेतली.’ असेही शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.





