\n\nShubham Impact Dubey right till the end! 💗
\nHe needed to step up and take us over the line. And he did! Watch Dubey wrap up #PBKSvRR for us 🎥 pic.twitter.com/VTXK7awUae
\n— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2026
\nशुभमचा प्रवास टेनिस क्रिकेटपासून सुरू झाला. सुरुवातीला हातामध्ये ग्लोव्ह्ज घेण्यासाठीही पैसे सायचे, अशा वेळी मित्रांनी त्याला मोलाची मदत केली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्थानिक सामन्यांमध्ये त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०२४ च्या लिलावात ५.८ कोटींची बोली लागल्यावर तो रातोरात प्रकाशझोतात आला. सध्या तो कमी किंमतीत (८० लाख) राजस्थानच्या ताफ्यात असला तरी, त्याची मैदानातील कामगिरी मात्र अमूल्य आहे.
हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi Reply : ‘देवानेच लावून दिलीये चिप…!’, बॅटमध्ये ‘AI’ चिप असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी विश्लेषकाची वैभवने केली बोलती बंद
\n\n\nWhether we win, whether we lose 🥹💗 pic.twitter.com/XaXjq21fhC
\n— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 28, 2026
\nशुभम स्वतःला एमएस धोनी, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि सौरव गांगुली यांचा चाहता मानतो. धोनीसारखे थंड डोके, युवराजसारखी फटकेबाजी आणि गांगुलीसारखा आत्मविश्वास ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने हे सर्व गुण दाखवत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विदर्भाचा हा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ आगामी काळात भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणार, यात शंका नाही.