\n\nCongratulations to R Vaishali on winning the Women’s Candidates and earning a shot at the World Championship! Wishing her the very best as she takes on Ju Wenjun – may her brilliance on the board inspire a new generation of young Indians to dream big and think bold. @FIDE_chess… pic.twitter.com/ywzeARl7QK
\n— Lokesh Nara (@naralokesh) April 16, 2026
\n२१ जून २००१ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या वैशालीने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच तिची बुद्धिमत्ता पटावर चमकू लागली होती. तिने अंडर-१२ आणि अंडर-१४ गटात मुलींचे जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. २०१८ मध्ये तिने वुमन ग्रँडमास्टर (WGM) आणि २०२१ मध्ये इंटरनॅशनल मास्टर (IM) ही पदवी मिळवली. २०२३ मध्ये कतार मास्टर्समधील शानदार कामगिरीनंतर ती भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर (GM) ठरली.
\n\n⭐️Vaishali Rameshbabu has won the FIDE Women’s Candidates 2026, earning the right to challenge for the Women’s World Chess Championship title!
\nThe 23yr old becomes one of India’s finest chess success stories, her brother Praggnanandhaa is already a top-10 player in the world
\n\n— Nabila Jamal (@nabilajamal_) April 16, 2026
\nवैशालीचा धाकटा भाऊ आर. प्रज्ञानंद हा देखील जागतिक स्तरावरील नामवंत ग्रँडमास्टर आहे. एकाच वेळी ग्रँडमास्टर पदवी धारण करणारी ही जगातील पहिली भाऊ-बहीण जोडी ठरली आहे. प्रज्ञानंदने पुरुष गटात आपला दबदबा निर्माण केला असतानाच, वैशालीने आता कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकून भारतीय बुद्धिबळाची मान उंचावली आहे. एकाच घरातील या दोन हिऱ्यांनी जागतिक बुद्धिबळ पटलावर भारताचे नाव अजरामर केले आहे.