Who is Madhav Tiwari Delhi Capilas New Star : आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या पंजाब किंग्सला सोमवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सने पराभवाचा धक्का दिला. पहिल्या ७ सामन्यांपैकी ६ सामने जिंकणाऱ्या पंजाबला दिल्लीने ३ गड्यांनी धूळ चारली. विशेष म्हणजे या पराभवासह पंजाबने सलग चौथा सामना गमावला आहे. या रोमहर्षक सामन्यात कर्णधार अक्षर पटेल, डेव्हिड मिलर आणि आशुतोश शर्मा यांच्या फटकेबाजीची चर्चा झालीच, पण एका २२ वर्षांच्या युवा अष्टपैलू खेळाडूने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तो खेळाडू म्हणजे माधव तिवारी. संधी मिळाली अन् सोनं केलं! कालच्या सामन्यापूर्वी माधव तिवारी हे नाव क्रिकेट चाहत्यांसाठी फारसं परिचयाचं नव्हतं. मात्र, पंजाबविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत ‘सामनावीर’ हा किताब पटकावला. सुरुवातीला गोलंदाजी करताना माधवने ४ षटकांत ४० धावांच्या बदल्यात २ महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्यानंतर २११ धावांच्या अजस्र लक्ष्याचा पाठलाग करताना जेव्हा दिल्लीला धावांची नितांत गरज होती, तेव्हा त्याने अवघ्या ८ चेंडूत १८ धावांची नाबाद खेळी करून दिल्लीला विजय मिळवून दिला. THE MADHAV TIWARI INTERVIEW. pic.twitter.com/P5s9aKckZQ — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 11, 2026 कष्टातून आयपीएलच्या मुख्य प्रवाहात – Last Night Hero…. Madhav tiwaripic.twitter.com/itReoVj5Gb — Cricket Guru (@CricketGuru_CG) May 12, 2026 मूळचा मध्य प्रदेशचा असलेला माधव तिवारी हा मध्यमगती गोलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने अद्याप आपल्या राज्याकडून एकही प्रथम श्रेणी किंवा लिस्ट-ए सामना खेळलेला नाही. मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये ‘भोपाळ लेपर्ड्स’कडून खेळताना त्याने केलेल्या कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने त्याला ४० लाख रुपयांच्या बोलीवर संघात सामील करून घेतले होते. यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला फारशी संधी मिळाली नव्हती, पण पंजाबविरुद्ध त्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. हेही वाचा – Shreyas Iyer Decision : कॅप्टनचा एक चुकीचा निर्णय पडला महागात? भरमैदानात चहलसोबत नेमकं काय घडलं? श्रेयस अय्यरने दिलं उत्तर! कौटुंबिक पाठिंबा अन् भारतासाठी खेळण्याचे स्वप्न – Madhav Tiwari sending a loud message in his very first game of the season — here to deliver with both bat and ball! 🌟#IPL2026 #PBKSvDC #Sportskeeda pic.twitter.com/RtuVcic1MK — PuwathX (@PuwathX) May 12, 2026 माधव तिवारीचे वडील वाहतूक व्यवसायात आहेत आणि आपल्या मुलाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे संसाधनांची कधीच कमतरता नव्हती. माधव आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्याला देतो. त्याने हेही सांगितले की, त्याच्या आईला क्रिकेटबद्दल काहीही माहिती नाही, तरीही ती त्याला पाठिंबा देते. मात्र, या प्रभावी कामगिरीनंतरही तो जमिनीवर पाय ठेवून आहे. तो सहज म्हणाला, “भारतासाठी खेळणे आणि सर्वोत्तम बनणे हे माझे ध्येय आहे, पण मला माहित आहे की माझा खेळ अधिक धारदार करण्यासाठी मला अजून खूप मेहनत करायची आहे.”