Anjana Krishna : अजित पवारांना भिडणाऱ्या IPS अंजना कृष्णा कोण आहेत? नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर…

Anjali Krishna : सोशल मीडियावर करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला. मात्र, अंजना कृष्णा यांनी अजित पवारांचा आवाज ओळखलाच नाही. यानंतर अजित पवारांनी थेट व्हिडीओ कॅालवरून त्यांच्याशी संवाद साधला. या व्हिडीओ आणि अॅाडिओ कॅाल संबंधिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अजित पवारांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्याला कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत दादागिरीची भाषा करण्यात आल्याने अजित पवारांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता या प्रकरणी कुर्ड गावातील १५ ते २० ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी घडल्याची माहिती आहे.
बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश आहे. याप्रकरणी ग्राममहसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार करमाळाच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा यांना प्राप्त झाली. या तक्रारीवरून त्यांनी संबंधित गावात जात पाहणी केली असता मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरिक आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्याकडे दिला.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मात्र, अजित पवार यांचा आवाज अंजना कृष्णा यांना ओळखता आला नाही. अॅाडिओ कॅालवरून अजित पवार दोन वेळा डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. असं म्हणत ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं. त्यावर थेट पोलिस अधिक्षक अंजना कृष्णा यांनी मेरे फौन पर काॅल करें.. असं अजित पवार यांना सांगितलं. या विधानामुळे अजित पवार चांगलेच संतापले आणि त्यांनी तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना.. असं रागावून म्हटले, असं या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून दिसत आहे.
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.#ajitpawar #AnjaliKrishna pic.twitter.com/ag2DNuf3do— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 2, 2025
कोण आहेत अंजना कृष्णा ?
- पोलीस अपअधीक्षक अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या आहेत.
- 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर
- सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी
- मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
- प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी
- अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण
- करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका
- दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई
- याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा यु-टर्न ! जपानवरील टॅरिफ २५ वरून १५ टक्क्यांपर्यंत केले कमी





