Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगेंनी सरकारकडे आठ प्रमुख मागण्या केल्या होत्या. या मागण्यापैंकी सहा मागण्या मान्य करत शासनाने हैदाराबाद गॅझेटचा आदेश लागू केला. मात्र, दरम्यानच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपांवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा आमचा कवडीचाही सबंध नाही. त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. ते सत्यावर आधारित नाही. त्यामुळे त्यावर भाष्य नको, अशी प्रतिक्रिया त्यांना विचारलेल्या जरांगेंच्या आंदोलनामागे हात असल्याच्या आरोपांवर दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिकमध्ये आज रविवारी १४ सप्टेंबर एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे यासाठी शरद पवार नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या सहकार्यांचा आग्रह होता. लोकसभा निवडणुकीत तीनही खासदारकीच्या जागा आम्हाला दिल्यात. स्थानिक जनतेशी सुसंवाद कसा करता यावा? यासाठी नाशिक निवडले, असल्याचं या शिबीरावर भाष्य करताना शरद पवार यांनी सांगितलं. मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरवर शरद पवार यांनी भाष्य केलं. या जीआरमुळे मराठा समाजाला लाभ होईल का या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, अ-ब-क असा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हेही वाचा : ‘लाइट बंद कर बे अंधे…’; जॅकी श्रॉफ पापाराझींवर भडकले; Video व्हायरल