वॉशिंग्टन – हिंद महासागरामध्ये जपानच्या जहारांवर करण्यात आलेला ड्रोन हल्ला इराणने केल्याचे अमेरिकेची संरक्षण संस्था पेंटॅगॉनने म्हटले आहे. भारताच्या स्वायत्त सागरी हद्दीमध्ये करण्यात आलेल्या या ड्रोन हल्ल्याबाबत अमेरिकेने इराणला थेट जबाबदार धरले आहे. एमव्ही चेम प्लुटो या टँकरवर २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डागण्यात आले होते. भारताच्या समुद्रकिनार्यापासून २०० सागरी मैलांवरच्या या टँकरवर डागले गेलेले हे ड्रोन इराणच्या भूमीवरून सोडण्यात आले होते. ड्रोन हल्ला झाला त्यावेळी या जहाजावर लायबेरीयाचा ध्वज होता. सुदैवाने या ड्रोन हल्ल्यामुळे या टँकरवरील कोणीही या ड्रोन हल्ल्यामुले जखमी झाले नाही आणि टँकरचेही गंभीर नुकसान झाले नव्हते. इस्रायल हमासचे युद्ध सुरू झाल्यापासून इराणने जहाजांवर हल्ला केल्याचा थेट आरोप अमेरिकेकडून प्रथमच करण्यात आला आहे. हमासला इराणचा पाठिंबा आहे. त्यामुळे इराण हमासला मदत व्हावी, अशा कारवाया करत आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे.