बोलता बोलता जीभ घसरली अन् विद्या बालन नको ते बोलून बसली! म्हणाली “मी दर महिन्याला प्रेग्नंट राहायची”

Vidya Balan : बॅालीवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री विद्या बालन आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ओळखली जाते. नुकतीच तिने एका मुलाखती दरम्यान प्रेग्नसींबाबत मोठं विधान केले आहे. तिने केलेल्या विधानाने बॅालीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या मुलाखतीवेळी विद्याने लग्न आणि मुलांबद्दल आपले मत स्पष्ट मत व्यक्त केले. दरमहा गर्भवती होत असल्याचे खळबळजनक विधान तिने या मुलाखतीमधील एका प्रश्नाला उत्तर देताना केले आहे. तिने केलेल्या या विधानामुळे बॅालीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. विद्या बालनने २०१२ साली बॅालीवूडचे निर्माते सिद्धार्थ रॅाय कपूर यांच्यासबोत लग्न केले. तिने आयडीडब्लूएशी बोलताना आई होण्याबाबत मोठं विधान केले होते. ३३ व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. लग्नानंतर लोक मला आई कधी होणार? हा प्रश्न विचारत होते. लग्न करत नव्हते तर, लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारत होते.
View this post on Instagram
आता लग्नानंतर बाळ कधी होणार, आई कधी होणार? असा प्रश्न विचारायला त्यांनी सुरूवात केली. या प्रसंगाची आठवण तिने या मुलाखतीत सांगितली. तसेच ती म्हणाली, जे लोक मला विचारायचे नेमकं कपड्यांमध्ये काय दिसत आहे? हा बेबी बंप आहे का? याबाबत प्रश्न विचारायचे त्यांना मी प्रत्येक महिन्याला प्रेग्नेंट राहत होती, असे तिने या मुलाखतीत उत्तर देताना म्हटले आहे.
लग्नानंतर तुम्हाला लोक जगू देणार नाही, कुटुंबापेक्षा समाजाला याविषयी कुतूहल असतं, असे देखील विद्याने म्हणाली आहे. बॉलीवूड स्टार्स नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठे गुपित शेअर करताना दिसतात. विद्या बालनने केलेले विधान बॅालीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.





