बेंगळुरू : जेव्हा जेव्हा कर्नाटक राज्यात निवडणुका असतात तेव्हा माझे वडील आणि काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतात. जेव्हा संसदीय निवडणुका होतात तेव्हा तेच पंतप्रधानपदाचे दावेदार असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नेता बदलण्याचा प्रश्न निर्माण झाला, तर माझे वडीलच त्या पदावर हक्क सांगतात, असे विधान कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले आहे. त्यांचे हे विधान आता भलतेच चर्चेत आले असून त्यावर प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत. कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या अटकळ असताना काँग्रेसच्या उच्च नेतृत्वातील बैठकींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील का, असे विचारले असता, खर्गे म्हणाले की, सर्व काही ठीक आहे पण सध्यासाठी असो वा भविष्यात, हायकमांड जो काही निर्णय घेईल तो सर्वजण पाळत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीबद्दल प्रियांक खर्गे म्हणाले, राहुल गांधी बेंगळुरू टेक समिटसाठी येणार होते. त्यांना एक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला वैयक्तिक संगणक लाँच करायचा होता. मी वेळ मागितला. म्हणून आम्ही तिथे गेलो आणि त्यांना एआय पीसी दाखवला. मी माझ्या हायकमांडला विभाग करत असलेले असाधारण काम दाखवू नये का?