मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन आज आयोजित करण्यात आले होते. हा सोहळा यशवंराव चव्हाण सेंटर येथे पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवारांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या निर्णयानंतर अनेक मंत्री आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शरद पवार यांच्या सोबतचा फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही. pic.twitter.com/kS4eIaDIn3
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 2, 2023
प्रशांत जगताप आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात की, “कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही.!’ असं ते म्हणाले.