‘पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे? तुम्ही कशाचा आनंद साजरा करताय?’; प्रकाश आंबेडकरांचा PM मोदींना सवाल

Prakash Ambedkar | पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. तसेच पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यांना देखील भारतीय सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानच्या या तणावाच्या परिस्थितीदरम्यान १० मे रोजी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली.
पाकिस्तानला दिलेल्या उत्तरानंतर भाजपकडून शहरांमध्ये तिरंगा रॅली काढत आनंदोत्सव साजरा केला जात आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटद्वारे केला आहे.
प्रकाश आंबेडकरांचे ट्वीट –
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, “मोदी, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? तब्बल महिनाभर उलटून गेला आहे. तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या पत्नीला अद्याप न्याय मिळालेला नाही,” असे प्रकाश आंबेडकरांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. Prakash Ambedkar |
Modi, where are the terrorists responsible for the Pahalgam terrorist attacks?
Almost a month has passed!
What are you celebrating?
Justice is not served yet to the wives of the victims who were killed in the attack! pic.twitter.com/er840V72Nb— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 19, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 भारतीय पर्यटकांनी आपला जीव गमावला. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तामध्ये घुसून दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट केले. यामध्ये 80 ते 90 दहशतवादी मारले गेल्याचे मिडिया रिपोटमध्ये म्हटले आहे. मात्र, पहलगाम हल्ला ज्या दहशतवाद्यांनी केला त्यांना अजुनही पकडण्यात आलेले नाही त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला आहे. Prakash Ambedkar |
अमित ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
तर दुसरीकडे, अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत खंत व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात म्हंटले की, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. Prakash Ambedkar |
वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे. युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, हीच अपेक्षा, असे अमित ठाकरेंनी म्हंटले आहे.
हेही वाचा:
उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली Oops मोमेंटची शिकार





