Astad Kale Post : एवढा पैसा कुठून आला? मंत्री प्रताप सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठमोळ्या अभिनेत्याचा थेट सवाल

Astad Kale Post : राज्याचे परिवहन मंंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या नातवासाठी टेस्ला ही सगळ्यात महागडी कार विकत घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर या कार खरेदीची जोरदार चर्चा रंगली. मात्र, एका मराठी अभिनेत्याने सरनाईकांनी केलेल्या टेस्ला कार खरेदीवर अनेक प्रश्न उपस्थित करत एक पोस्ट शेअर केली आहे.
खरंतर राज्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अनेकांचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीवही गेला आहे. यामुळे नागरिकांकडून खड्ड्यांच्या समस्येवर संताप व्यक्त केला जातो. मराठी कलाकारही या प्रश्वावर पोस्ट शेअर करत असतात. अशातच आता मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे याने इंन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने रस्त्यावरील खड्ड्यांवर संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईकांना काही प्रश्न विचारले आहेत.
काय म्हणाला आस्ताद काळे?
नातवासाठी घेतलेल्या टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती आहे काका? प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून कष्टाच्या पैशांतून घेतलेली वाहन चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो का? असा सवाल आस्तादने केला आहे.
View this post on Instagram
पुढं पोस्टमध्ये तो म्हणाला, ता. क. – एवढा पैसा कुठून आला काका? तुमच्या लाडक्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावर न्यायला सांगाल ना… बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता. उत्तरं नसतीलच..आपण प्रश्न विचारत राहायचं, असं कॅप्शन अभिनेत्याने या पोस्टला दिलं आहे.
इंन्स्टाग्रावर करण्यात आलेल्या अभिनेता आस्ताद काळेच्या पोस्टमुळे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. या पोस्टवर भरपूर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.




