Animal 2 : २०२३ मध्ये अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘अॅनिमल‘ हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर प्रदर्शिद झाला होता. या चित्रपटाने मोठा इतिहास रचत कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकले. २०२३ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा बहुमान अॅनिमलने मिळवला. या चित्रपटाने ९१७ कोटींची दमदार कमाई केली. त्यानंतर या अॅक्शन चित्रपटाचा सिक्वल कधी हेणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. याबाबत चित्रपटात रणबीर कपूरच्या अॅानस्क्रीन बहीणीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सलोनी बत्रा हिने एक मोठी हिंट दिली आहे. अभिनेता रणबीर कपूरच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट म्हणून अॅनिमलकडे पाहिले जाते. चित्रपटातील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलोनी बत्रा हिने अॅनिमल २ बाबत भाष्य केले आहे. अॅनिमल चित्रपटाच्या सिक्वलला अॅनिमल पार्क असे नाव देण्यात आले आहे. पण सध्या तरी अॅनिमल २ असेच सिक्वलला म्हटले जात आहे. अभिनेत्री सलोनी बत्रा हिची भय नावाची वेबसिरीज अॅमेझॅान मिक्सवर प्रदर्शित झाली असून, या वेबसिरीजच्या निमित्ताने ती मुलाख देत आहे. एका मुलाखतीत तिला अॅनिमल २ कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर “मी अॅनिमल चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आहे. प्रेक्षकांनी अॅनिमल चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं. अॅनिमल चित्रपट सुपरहिट ठरला. अॅनिमल 2 चित्रपटातही अधिक अॅक्शन आणि मनोरंजनने परिपूर्ण असेल”, असे सलोनीने म्हटले आहे. तसेच अभिनेत्रीने मुलाखतीत तिच्या करिअरच्या प्रवासाविषयी देखील माहिती शेअर केली आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या भागाचे दिग्दर्शनही संदीप रेड्डी वांगा करत आहेत. सध्या ते स्पिरीट चित्रपटात व्यस्त असून हा चित्रपट अॅानफ्लोअर आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून आगामी काही दिवसांत चित्रपटाच्या प्रदर्शिनाविषयी अपडेट दिली जाऊ शकते. हेही वाचा : राज्यात नंबर 1चा ठरलेल्या पक्षाला ‘या’ ठिकाणी मिळाला मोठा पराभव; भाजपच्या संपूर्ण पॅनेलचे डिपॉझिटच जप्त