इतरांचे मनं समजून घेणारा स्वत:च नि:शब्द होतो तेव्हा…; मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरनेच उचललं टोकाचं पाऊल

Akola News | मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सन्मित्र हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी विषारी इंजेक्शन घेऊन जीवन संपवले.
अकोल्यातील न्यू तापडिया नगर भागातील त्यांच्या घरात त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. डॉ. प्रशांत जावरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. अनेक रुग्णांना मानसिक आधार देणारे डॉ. जावरकर यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
प्राथमिक तपासात त्यांनी स्वतः विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. डॉ. जावरकर यांच्या आत्महत्याची बातमी समजताच अकोल्यात वैद्यकीय व मानसोपचार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. Akola News |
दरम्यान, आत्महत्या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचं मूळ कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मृत डॉक्टरच्या मोबाईलमध्ये किंवा घरात कोणतेही सुसाईड नोट आढळून आली नाही. त्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारण होते का? याचा तपास पोलीस करत आहे.
परंतु, डॉ.जावरकर यांच्या जाण्याने अकोला शहरात मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. डॉ. जावरकर यांच्याकडून नियमित उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्येही मोठी शोककळा पसरली आहे. Akola News |
हेही वाचा:
इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेची उडी; ‘सामना’तून राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर घणाघात





