जेव्हा एका मोठ्या चित्रपट निर्मात्याने श्रद्धा कपूरला ‘कामुक’ चित्रपटाची दिली ऑफर; अभिनेत्रीने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया

मुंबई – आज 03 मार्च रोजी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा वाढदिवस आहे. श्रद्धा आज 35 वर्षांची झाली आहे. श्रद्धा इंडस्ट्रीतील तिच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखली जाते ज्यात आशिकी 2, स्त्री, छिछोरे आणि साहो इत्यादींचा समावेश आहे. दिग्गज स्टार शक्ती कपूर यांची मुलगी असूनही श्रद्धा कपूरला इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेक चढउतारांचा सामना करावा लागला होता.
चित्रपटांच्या अपयशामुळे एकेकाळी तिच्या हातून मोठे प्रोजेक्ट्सही बाहेर पडले आहेत. यासोबतच तिला अशा चित्रपटांची ऑफरही आली होती जी तिला करायची नव्हती. ‘आशिकी 2’ मधून लोकप्रिय झालेल्या श्रद्धा कपूरने ‘तीन पत्ती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. मात्र, ‘तीन पत्ती’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला, ज्याचा फटका श्रद्धाला सहन करावा लागला.
‘तीन पत्ती’ फ्लॉप झाल्यानंतर संजय लीला भन्साळीचा ‘माय फ्रेंड पिंटो’ हा चित्रपट श्रद्धाच्या हातातून गेला. एवढेच नाही तर यानंतर श्रद्धाला एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने कामुक चित्रपटाची ऑफर दिली होती, ज्यामुळे अभिनेत्री पूर्णपणे गोंधळली होती. अभिनेत्रीला कामुक चित्रपट करायचे नाहीत हे या चित्रपट निर्मात्याला कसे सांगायचे ते तिला समजत नव्हते. नंतर तिने चित्रपट निर्मात्याला आपला हेतू सांगितला.
श्रद्धा सांगते की, ‘तीन पत्ती’ रिलीज होण्यापूर्वी मी ‘माय फ्रेंड पिंटू’साठी ऑडिशन दिले होते. मला कोणत्याही किंमतीत या चित्रपटात काम करायचे होते, त्यासाठी मी माझे रात्रंदिवस मेहनत सुद्धा घेतली होती. मात्र, माझ्या ऐवजी या चित्रपटात आणखी कोणाला तरी घेण्यात आल्याचा फोन मला आला. त्यानंतर मी माझ्या खोलीत तीन दिवस रडत बसले. श्रद्धा कपूर लवकरच रणबीर कपूरसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.





