Priyanka Chopra’s first look of Varanasi movie: ‘ती हसत नाही तेव्हा तिच्या नजरेत आग असते!’ प्रियांका चोप्राचा ‘वाराणसी’मधील फर्स्ट लुक व्हायरल
Priyanka Chopra's first look of Varanasi movie हे फोटो शेअर करताना एस. एस. राजामौली यांनी एक खास कॅप्शन लिहिले. त्यांनी म्हटले, “ती हसते तेव्हा खूप सुंदर दिसते... आणि ती हसत नाही तेव्हा तिच्या नजरेत आग असते.” त्यांच्या या एका वाक्यामुळे प्रियांकाच्या ‘मंदाकिनी’ या व्यक्तिरेखेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Priyanka Chopra’s first look of Varanasi movie: बॉलिवूड ते हॉलीवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत मोठ्या भूमिकेसह पुनरागमन करत आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुचर्चित ‘वाराणसी’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील तिचा ‘मंदाकिनी’ या व्यक्तिरेखेचा पहिला लुक नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त राजामौली यांनी हे खास फोटो शेअर करत तिच्या व्यक्तिरेखेची झलक चाहत्यांसमोर आणली. (Priyanka Chopra’s first look of Varanasi movie)
राजामौली यांनी सोशल मीडियावर दोन वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये प्रियांकाने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. तिची हेअरस्टाईल, चेहऱ्यावरील गंभीर भाव आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोली लक्ष वेधून घेते. तिचा हा लुक चित्रपटातील एका खास गाण्यातील असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती पांढरा शर्ट आणि काळी पँट घालून उडी मारताना दिसते. तिच्या मागे झेब्रा, जिराफ यांसारखे प्राणी दिसत असल्याने हा सीनही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ठरला आहे.
हे फोटो शेअर करताना एस. एस. राजामौली यांनी एक खास कॅप्शन लिहिले. त्यांनी म्हटले, “ती हसते तेव्हा खूप सुंदर दिसते… आणि ती हसत नाही तेव्हा तिच्या नजरेत आग असते.” त्यांच्या या एका वाक्यामुळे प्रियांकाच्या ‘मंदाकिनी’ या व्यक्तिरेखेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Priyanka Chopra’s first look of Varanasi movie)
View this post on Instagram
चित्रपटातील ‘मंदाकिनी’ ही व्यक्तिरेखा धाडसी, आत्मविश्वासू, भावनिक आणि जगभर प्रवास करणारी महिला म्हणून दाखवण्यात आली आहे. ती संकटांना न घाबरणारी आणि आपल्या ध्येयासाठी लढणारी व्यक्ती आहे. त्यामुळे प्रियांकाच्या कारकिर्दीतील ही आणखी एक दमदार भूमिका ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Priyanka Chopra’s first look of Varanasi movie)
प्रियांका चोप्राने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आणि नंतर हॉलीवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच तिच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे ती जागतिक स्तरावर लोकप्रिय झाली आहे.
‘वाराणसी’ हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द स्काय इज पिंक’ नंतरचा प्रियांकाचा पहिला भारतीय चित्रपट आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबू प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच अनेक लोकप्रिय कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. (Priyanka Chopra’s first look of Varanasi movie)
प्रियांकाने अद्याप तिच्या व्यक्तिरेखेबद्दल किंवा चित्रपटाच्या कथेबद्दल कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने गेल्या 14 महिन्यांपासून या भूमिकेची तयारी करत असल्याचे सांगितले होते. यावरून या भूमिकेसाठी तिने विशेष मेहनत घेतल्याचे स्पष्ट होते.
एस. एस. राजामौली हे भव्य आणि दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे ‘वाराणसी’ या चित्रपटाकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. हा चित्रपट 7 एप्रिल 2027 रोजी प्रदर्शित होणार असून, प्रियांका चोप्राचा दमदार अभिनय आणि तिचा नवीन अवतार मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.





