मुंबई – जेव्हा टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने धर्माच्या सर्व भिंती तोडून प्रेमाचा स्वीकार करून नवीन आयुष्य सुरू केले होते. आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत हे तुम्हाला समजले असेल. अभिनेत्री दीपिका कक्कर, जिला टीव्हीची ‘सिमर’ म्हटले जाते.
View this post on Instagram
दीपिकाने ‘सिमर’ बनून लाखो प्रेक्षकांना वेड लावले आणि त्यानंतर खऱ्या आयुष्यातही तिच्या ‘प्रेमा’सोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. सध्या दीपिकाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
22 फेब्रुवारी 2018 रोजी दीपिका कक्करने ‘ससुराल सिमर का’चे प्रेम उर्फ शोएब इब्राहिमशी लग्न केले. त्यावेळी दीपिकाने शोएबशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि तिचे नाव बदलून फैजा ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. या वृत्ताला दीपिका आणि शोएबच्या लग्नाच्या कार्डने खरे ठरवले आहे. यांच्या लग्नाची पत्रिका सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या लग्नपत्रिकेत दीपिकाचे नाव ‘फैजा’ लिहिले होते, जे वाचून लोकांना खात्री पटली की दीपिकाने खरोखरच धर्म बदलला होता,
बॉलीवूड रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दीपिकाने तिचे नाव निश्चितपणे बदलून ‘फैजा’ ठेवले होते, परंतु केवळ निकाहसाठी. दीपिकाने तिचे खरे तर नाव बदलले नाही. हे केवळ लग्नपत्रिकेसाठी करण्यात आले. दीपिकाने तिच्या नावासमोर फक्त शोएबचे आडनाव ‘इब्राहिम’ जोडले आहे. दरम्यान आता या पत्रिकेवरून चाहते सोशल मीडियावर चर्चा करतांना दिसत आहे. सध्या दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम लग्नाच्या ५ वर्षानंतर लवकरच आई-वडील होणार आहेत. या जोडप्याने काही दिवसांपूर्वी प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आपल्या पहिल्या मुलाला जन्म देण्यासाठी अभिनेत्री खूप उत्साहित आहे.