पुणे – सांस्कृतिक ओळख असणाऱ्या पुणे शहराची अनेक कारणामुळे नेहमीच चर्चा असते. मात्र यावेळी पुण्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात एक प्रेमीयुगूल भर चौकात एकमेकांना मिठी मारताना दिसतात. त्यांच्या कृतीमुळे वाहतूक कोंडी झाल्याचेही दिसते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका पुण्यातील कोणत्या चौकातील आहे. हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत एक जोडपे रस्त्याच्या मधोमध मिठी मारताना दिसत आहे. यावेळी ट्रॅफिक पोलिसांसह काही लोक तिथे जमल्याचे दिसते. या जोडप्याला तेथून बाजूला जाण्याचा अनेकदा प्रयत्न करताना ते दिसतात. मात्र काही वेळानंतर हे जोडपे तेथून निघून जातात.
भर चौकात त्यांनी मारली मिठी, पुण्यातील ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल#Pune #socialmedia #VideoViral pic.twitter.com/qMJmQibGMc
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) April 2, 2023
दरम्यान, मुंबईतील एका तरुणाचा तरुणींसोबत बाइकवर स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यात एक तरुण दोन तरुणींसोबत बाइकवर जीवघेणी स्टंटबाजी करतानाचा दिसतो. तरुणाच्या पुढे एक आणि मागे एक अशा दोन तरुणी बसल्याचे दिसते. त्यानंतर हा तरुण धावत्या बाईकचे पुढचे चाक उचलतो आणि एका चाकावर काही मीटरपर्यंत बाइक चालवतो. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.