“…हा गुन्हा आहे का?” पराभवानंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

Raju Shetty | लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या अधिक उमेदवारांना यश मिळाल्याचे दिसले. तर महायुतीला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा निवडणुकांमधील हातकणंगलेची जागा देखील चर्चेत होती. येथून शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने विजयी झाले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव झाला आहे. यानंतर राजू शेट्टींनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
पराभवानंतर राजू शेट्टी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी माझं काय चुकल! प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांनो तुम्हीही… असं म्हणतं पोस्ट शेअर केली आहे. या मतदार संघातील सर्वसामान्य शेतकरी गरीब कष्टकरी वर्ग माझ्या पाठीशी असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते. मात्र धैर्यशील माने 13426 मतांनी विजयी झाले आणि सत्यजीत पाटलांसह राजू शेट्टी यांनाही पराभावाचा धक्का सहन करावा लागला.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती. धैर्यशील माने, सत्यजीत पाटील आण राजू शेट्टी असा सामना होता. यामध्ये धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचं पाहायला मिळालं. अत्यंत अटीतटीची ही लढत झाली. यामध्ये धैर्यशील माने हे फक्त 13426 मतांनी विजयी झाले आहेत.
माने यांना एकूण 5,20,190 मते मिळाली तर सत्यजीत पाटील यांना एकूण 5,06,764 मते मिळाली. तर राजू शेट्टींना एकूण 1,79,850 मते मिळाली. या निवडणुकीत राजू शेट्टींचा तब्बल 3,40,000 मतांनी पराभव झाला आहे. यानंतर आता राजू शेट्टी यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा:
साऊथ चित्रपट ‘सत्यभामा’मध्ये अभिनेत्री काजल अग्रवाल साकारणार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका





