Sharad Pawar : शरद पवारांंना नेमकं काय झालं होतं? प्रकृतीबाबत डॅाक्टरांनी दिली महत्वाची अपडेट
Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर रुबी हॅाल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून, त्यांना डिस्चार्ज कधी दिला जाईल आणि त्यांच्या प्रकृतीबाबत डॅाक्टरांनी महत्वाची अपडेट दिली आहे.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना दोन दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा पुण्यातील रुबी हॅाल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांना कधी डिस्चार्च दिला जाणार आणि त्यांची तब्येत कशी आहे. याबाबत डॅाक्टरांनी महत्वाची अपडेट दिली आहे.
अजित पवारांच्या निधानानंतर काही दिवसानंतर शरद पवारांना पुण्यातील रुबी हॅाल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना श्वसनासंबंधी त्रास जाणवत असल्याने त्यांनी अॅडमिट करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करून डॅाक्टरांनी त्यांना डिस्चार्च दिला. पण २२ फेब्रुवारीला त्यांना पुन्हा रुबी हॅालमध्ये दाखल करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत शरद पवार यांची विविध तपासणी केली जात असल्याचे सांगितले होते.
डॅाक्टर काय म्हणाले?
आता शरद पवारांवर उपचार करत असलेल्या डॅाक्टरांनी त्यांना नेमकं काय झाले होते. याविषयी सांगितले आहे. ‘शरद पवार यांची तब्येत उत्तम आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यांच्या छातीत थोडं इन्फेक्शन झालं होतं. ते पूर्णपणे कव्हर झालं आहे. त्यामुळे उद्या सकाळी त्यांना घरी सोडलं जाईल. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका कारण शरद पवार यांची तब्येत आता ठीक आहे. उद्या घरी सोडल्यानंतर ते थोड्या दिवसांनी प्रवास करू शकतात.’ अशी महत्वाची माहिती रुबी हॅाल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रँड यांनी दिली.






