करोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही करोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. घरात रहा. घराबाहेर पडू नका. सुरक्षित अंतर ठेवा. लॉकडाऊनही झाले. क्वारन्टाइन करण्यात येऊ लागले. लॉकडाऊन काही अंशी उठवण्यात आले. परगावी असणारी लोकांना घराकडे परतण्याची ओढ लागली. गावाकडे निघाले त्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले. गावाकडे आले. परंतु गावतीलच नाही तर घरची माणसंही परक्या सारखी वागू लागलीत. प्रशासनाच्या नियमानुसार क्वारन्टाइन नंतर या. काही ठिकाणी तर गावात घेणचं बंद केले. आपलं गावसह आपली माणसं परकी झाली. त्यामुळे त्यांची काय अवस्था झाली याची कल्पना न केलेलीच बरी. लोकानी या लोकांना आधार द्यायला हवा. गावातील शाळा किवा सरकारी विलगीकरण कक्षात त्यांना ठेवा. मात्र, त्यांना आधार द्या. ज्यांना करोनाने घेतले आहे. त्यांना जगण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे रुग्णांना करोनाशी लढण्याची शक्ति मिळेल आणि ते पूर्ण बरे होतील. आपलं गाव आणि आपली माणसं लवकरच मिळावीत. त्यामुळे बिमारीसे लढणा है….बिमारोंसे नही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे. अशोक पिसे , नाथनगर, मोरगे वस्ती ,श्रीरामपूर. संपर्क : 9130075011