Riteish Genelia : लग्न म्हणजे काय? रितेश-जिनिलीयाचा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स, एकदा बघाच!

अभिनेत्री रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख ही जोडी महाराष्ट्राची लाडक्या दादा वहिनीची जोडी आहे. दोघांचाही चाहतावर्ग मोठा आहे. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी इन्स्टाग्रामवरून रील करताना दिसतात. त्यांच्या रिल्स विनोदी आणि खळखळून हसवणाऱ्या असतात. नुकतीच त्यांनी अशीच एक खळखळून हसू येणारी रिल प्रेक्षकांसाठी तयार केली आहे. या रीलवर चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स येत आहेत.
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावर लग्न म्हणजे काय? असे लिहिलेले दिसत आहे. जिनिलीया रितेशला म्हणते, “अहो लग्न म्हणजे काय हो?”, त्यावर रितेश म्हणतो, “अगं लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा”, या वाक्यनंतर रितेशच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहण्यासारखे आहेत. जिनिलीया त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत असल्याचे दिसत आहे.
शेवटी काय बोलून गेलो असं गाण ऐकायला मिळतं. रितेश व जिनिलीयाच्या नव्या रिलवर चाहत्यांनी अगदी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. सर्व कमेंट्स अत्यंत मजेशीर आहेत. दादाचं काही खर नाही हो आता दादा आता जेवण विसरा, आज जेवण मिळणार नाही, खतम टाटा बाय बाय, अशा भन्नाट कंमेट्स त्यांच्या चाहत्यांनी केल्या आहेत.





