Uddhav Thackeray | मतदान केल्यानंतर काही वेळातच बोटावरील शाई पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी मतदान याद्यांमध्ये मोठा घोळ असून शाई पुसली जात असल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक आयुक्तांसह भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या निलंबणाची मागणी केली आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आयुक्तांवर कारवाई करावीच लागेल. त्यांचा स्टाफ रोज काय करतो. सरकारी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात राजकीय प्रतिनिधी ठेवावे लागेल. इतकी वर्ष पगार खाता, आतापर्यंत केलं काय? मी पूर्ण आयोगावर कारवाईची मागणी करतोय. त्यात महापालिका आयुक्त असतील किंवा आयुक्तालयाची माणसं असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.” शाई नाही, तर लोकशाही पुसली जातेय राज्याचे निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा. बोटावरची शाई पुसली जात आहे. निवडणूक आयोग आणि आयुक्त कसला पगार खात आहेत? 9 वर्षांनंतर निवडणूक होत आहे. नवीन मतदार येतात, जातात, मात्र सुधारणा कसल्याही दिसत नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजप आणि मित्र पक्षांनी अनेक प्रयत्न केलेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी बरेच घोटाळे केले. बाईचा फोटो दाखवला. बाईचं नाव रविंद्र असेल का? भाजपच्या पाट्या मतदान केंद्रावर ठेवल्या जातायत. शाई पुसली जात नाही आहे तर लोकशाही पुसली जात आहे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी हारली आहे.” संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा निवडणूक आयोग हा संविधानविरोधी आहे. संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा. मुख्यमंत्री म्हणतात हा रडीचा डाव आहे. मग तुम्ही काय अधिकाऱ्यांना घर गडी नेमले आहात का?, असा सवालही त्यांनी फडणविसांना केला. टांगा फरार करणाऱ्या नाईकांच्याच टांगा दुखल्या असतील दुसरीकडे मंत्री, भाजप नेते गणेश नाईक यांना निवडणूक केंद्र शोधण्यासाठी चार तास लागले. त्यांना तंगडतोड करावी लागली. टांगा फरार करणाऱ्या नाईकांच्याच टांगा दुखल्या असतील. गणेश नाईकांना मतदान केंद्र शोधण्यासाठी चार तास लागले. या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयुक्तांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. हेही वाचा: “…तर मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही”; शाई पुसत असल्याच्या वादावर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण