भाषणाबाबत उत्सुकता मंचर – आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील मंत्री झाल्यानंतर प्रथमच रविवारी (दि. 9) येत असल्याने ते नेमके काय बोलणार, याकडे तालुक्यासह राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.मंत्री वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी दिली. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा शिवगिरी मंगल कार्यालय, मंचर येथे सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. यास ते मार्गदर्शन करणार आहेत. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते; परंतु शरद पवार यांची साथ सोडत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले, त्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. कारण सांगणार का? ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू म्हणून दिलीप वळसे पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते; परंतु शरद पवार यांची साथ सोडत लोकप्रतिनिधी वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना धक्का बसला. वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ का सोडली, याबाबत अनेकजण संभ्रमात आहे. त्यांनी भूमिका का घेतली, याबाबत मेळाव्यात वळसे पाटील काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.