Devendra Fadnavis | पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ज्यात महापालिकेत सत्तेत आल्यास पुणे-पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना मोफत बस आणि मेट्रो प्रवास सुविधेचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावलाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीत अजित पवार यांच्या मेट्रो तिकीट मोफत करण्याबाबतच्या विधानाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? फडणवीस म्हणाले की, “मी तर आज घोषणा करणार होतो की पुण्यातून उडणाऱ्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. आपल्या बापाचं काय जातं घोषणा करायला? अजित पवारांनी दिलेले हे मोफतचे आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही हे पुणेकरांना माहित आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत स्पष्टीकरण देत फडणवीस म्हणाले, “मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाही. मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोच्या बॉडीचे अध्यक्ष हे केंद्रिय सचिव असतात आणि एमडी हे महाराष्ट्राचे असतात. मेट्रोचे आपण फेअर फिक्सेशन करतो, त्यावेळी कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झालेली आहे आणि त्या कमिटीलाच कायद्याने दिलेले अधिकार आहेत. Devendra Fadnavis | उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं, तरी मला करता येत नाही. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे. समाजा जर हा खर्च तुम्ही काढणार नसाल आणि सवलत द्याची असेल तर तुम्ही कुठून पैसे देणार हे सांगा. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासने देऊ नये,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis | हेही वाचा: निदर्शकांच्या मृत्यूवर डोनाल्ड ट्रम्प संतापले ; म्हणाले,”आता आमचं सैन्य तेहरानवर हल्ला करण्यास सज्ज”