Ramdas Athawale : मी असताना राज ठाकरेंची महायुतीला गरज काय? रामदास आठवले यांची खोचक टीका

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्री पदाची आशा आहे. मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर त्यांनी खोचक टीका केली आहे.
नेमके काय म्हणाले रामदास आठवले?
राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फायदा नाही. राज ठाकरेंची मी असताना महायुतीला गरज नाही. राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे अशी खोचक टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
‘सपाचे काही नेते भाजपची ‘B’ टीम ‘ ; आदित्य ठाकरेंचा अबू आझमींवर हल्लाबोल
महाविकास आघाडीवर साधला निशाणा
महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये असे ते म्हणाले. ईव्हीएम मशीन तर याच लोकांनी आणली. आता पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या की नाही हे निवडणूक आयोग ठरवेल असे ते म्हणाले. महाविकास आघाडीने आता पराभव मान्य करावा असा टोमणा रामदास आठवले यांनी लगावला आहे.





