काय सांगता ! हॉटेलमधील बर्गरमध्ये होता विंचू; तरुणाने पहिला घास खाताच…

जयपूर – आपण नेहमीच हॉटेलमध्ये जाऊन आवडीने पिझा बर्गर डोसा असे अनेक पदार्थ खात असतो. चवीने खात असणाऱ्या या पदार्थमध्ये जर किडे किंवा भेसळ निघाली तर त्यामुळे आपल्या जीवाला हानी होऊ शकते.
असेच काहीसे जयपूर येथील नामांकित हॉटेलमध्ये घडले आहे. एका तरुणाने या हॉटेल मध्ये बर्गरची ऑर्डर दिली होती. बर्गर आल्यानंतर त्याने जेव्हा तो खाल्ला त्यावेळी त्याला पहिल्याच घासाला काही तरी चावल्यासारखे झाले. आणि बर्गरला चवही विचित्र आल्याने त्याने अर्धा खास बाहेर काढला यावेळी त्याने उरलेला बर्गर उघडून पाहिल्यावर त्यात मेलेला विंचू असल्याचं दिसून आलं.
या बाबत त्याने हॉटेलच्या स्टाफला सांगितले असता त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त न करता त्या तरुणावर आणि त्याच्या मित्रावर दादागिरी करत त्यांना धमकी दिली मात्र तरुणांनी याबाबत पोलिसानंकडे तक्रार केली. याच दरम्यान विंचू चावलेल्या तरुणाचीही अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता या संपूर्ण घटनेवर पोलिसांकडून तपास सुरु आहे.






