“घरे पाडून कशाचा बदला घेतात….”; बुलडोझरच्या कारवाईवरून अखिलेश यादव यांचा भाजपवर हल्लाबोल

Akhilesh Yadav | उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद जिल्ह्यातील नवाबगंजमध्ये घरांवर कारवाई करण्यात आली. येथील उखरा गावात 18 कुटुंबांच्या घरांवर बुलडोझर टाकून त्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील कुटुंबीय गावातील सोसायटीच्या जमिनीवर कब्जा करून त्यावर वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे घरे बांधून राहत होती. शनिवारी सायंकाळी त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवले. अंधारामुळे केवळ 18 घरांवर कारवाई होऊ शकली, तर उर्वरित 5 घरांवर आज कारवाई करण्यात अलयाचे वृत्त समोर आले आहे.
ये है प्रतिशोध से भरी भाजपाई राजनीति का वीभत्स चेहरा। भाजपा बसे-बसाये घरों को गिराकर सुख पाती है। जिन्होंने अपने घर नहीं बसाये, पता नहीं वो दूसरों के घर गिराकर किस बात का बदला लेते हैं। हर गिरते घर के साथ भाजपा भी और भी नीचे गिर जाती है।
अमृतकाल के सूचनार्थ : आज लोकसभा… pic.twitter.com/pvA5YkZoLN
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 29, 2024
अखिलेश यादव यांचे ट्वीट
यूपीचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी यावर त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केले आहे. त्यांनी लिहिले, ‘हा सूडाने भरलेल्या भाजपच्या राजकारणाचा कुरूप चेहरा आहे. घरे पाडून भाजपला आनंद मिळतो. ज्यांनी आपली घरे बांधली नाहीत, ते दुसऱ्यांची घरे पाडून कशाचा बदला घेतात, हेच कळत नाही.”
“लोकसभेच्या फारुखाबादच्या अमृतपूर विधानसभेच्या उखरा गावात राहणाऱ्या २५ गरीब कुटुंबांच्या घरांवर आज बुलडोझर चालवून अनेक वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुले, माता, बहिणी, मुली यांना बेघर करण्यात आले. ही राजकीय क्रूरतेची परिसीमा आहे,” असे म्हणत अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली.





