Harshvardhan Sapkal : राज्यात गाजत असलेल्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. नुकतीच या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती. सुळेंनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आपलं आयुष्य अर्पण केलं, आणि आज त्याचा वारसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढे नेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुळे यांचे वक्तव्य चीड आणि संताप व्यक्त करणारं असल्याचे म्हटले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? Harshvardhan Sapkal Harshvardhan Sapkal : सुप्रिया सुळे असं काय म्हणाल्या होत्या? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात “त्यांचं वक्तव्य चीड आणणारे…” खरात प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी फडणवीस यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. तसेच, एके काळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेविरुद्ध आपलं आयुष्य अर्पण केलं, आणि आज त्याचा वारसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढे नेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले? Harshvardhan Sapkal सुळे यांचे वक्तव्य चीड आणि संताप व्यक्त करणारं आहे. दाभोलकरांच्या खुनाच्या आरोपांतून काही आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांना निर्दोष मानण्यात आले होते, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी कोणता मार्ग निवडला, याबाबत सुळे यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्याप्रकरणी घेतलेल्या आक्षेपावर सुप्रिया सुळे काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Peddi Pehelwan Glimpse Out: “राम चरणचा ‘पेड्डी’मधील पहलवान लुक व्हायरल; ‘दंगल’-‘सुलतान’ची आठवण”