West Bengal Elections : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) मिळवलेला विजय हा ऐतिहासिक मानला जात आहे. १५ वर्षांची सत्ताविरोधी लाट आणि टीएमसीच्या अंतर्गत आव्हानांचा फायदा घेत भाजपने सहा मुख्य घटकांच्या जोरावर हा गड सर केला. पंतप्रधानांच्या जोरदार निवडणूक प्रचाराने भाजपच्या प्रचंड विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणूक सभांमध्ये त्यांनी भ्रष्टाचारावरून तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढवला आणि विकासावर भर दिला. त्यांनी सत्ताधारी टीएमसीवर हिंसाचार आणि गैरकारभाराचा आरोप केला आणि तरुण व महिलांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. भाजपच्या या विजयानंतर भाजपच्या महिला नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. जो सनातनला आणि भगव्याला विरोध करेल, त्याच्यासोबत एकही राज्य उभा राहणार नाही, आज ममता बॅनर्जींचा अहंकार तुटल्याचं राणा यांनी म्हटलंय. (West Bengal Elections) West Bengal Elections : आता खेला होबे नही, खेला खतम हो गया.! नवीन राणा यांनी ममता बॅनर्जींना डिवचलं पश्चिम बंगाल हे आपल्या देशाचं राज्य आहे, जे आपल्याकडेच राहिले पाहिजे. पश्चिम बंगालमधील लोकांनी आज ते करुन दाखवलंय. पश्चिम बंगालमध्ये देशाच्या जनतेला जो निकाल अपेक्षित होता, तो आज आलेला आहे. इतक्या वर्षानंतर ममता बॅनर्जीचा खेल खतम झालेला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक रणनीती बनवली होती, त्या रणनीतीचा हा विजय आपण सर्वजण पाहतोय, असे म्हणत नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींच्या पराभवावर भाष्य करत नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली. ममता बॅनर्जींचा खेला खतम होबे.! पश्चिम बंगालमध्ये जे ज्येष्ठ नेते होऊन गेले, त्यांनाही आज आनंद होत असेल. कारण, आज ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, अत्याचार करणाऱ्याला ममता बॅनर्जी सपोर्ट करत होत्या, असे देखील त्या म्हणाल्या आहेत. (West Bengal Elections) जो सनातनला आणि भगव्याला विरोध करेल, त्याच्यासोबत एकही राज्य उभा राहणार नाही. ममता बॅनर्जी का खेला अब खतम हो गया है, आता खेला होबे नही, खेला खतम हो गया… असे म्हणत नवनीत राणांनी ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर भाष्य करत टीका केलीय.