ममता बॅनर्जी यांना CAA, NRC अमान्य; 19 लाख बंगाली हिंदुंची नावे हटवल्याचा दावा

कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २४ परगणातील बनगाव येथे झालेल्या प्रचारसभेत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीवर तुफान टीका केली. हा कायदा आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. ( West Bengal CM Mamata Banerjee says, “I will not allow NRC… Names of 19 lakh Hindu Bengalis have been removed from the list in Assam)
सीएए आणि एनआरसी हे एक कास्थान असल्याचा आरोप करताना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर भारतात निवडणुकाच होणार नाहीत असा दावाही त्यांनी केला. आपण एनआरसीला मान्यता देणार नाही. आसाममध्ये १९ लाख बंगाली हिंदूंची नावे हटवण्यात आली आहेत. कोणी मला माझ्या माता- पित्यांच्या प्रमाणपत्रांबद्दल विचारले तर मला त्यांची जन्मतारीखही माहिती नाही.
#WATCH | North 24 Parganas, Bangaon: West Bengal CM Mamata Banerjee says, “I will not allow NRC… Names of 19 lakh Hindu Bengalis have been removed from the list in Assam…If they ask me for my parents’ certificate, I don’t even know their birthday, from where will I get the… pic.twitter.com/2At9XCutzT
— ANI (@ANI) May 13, 2024
मी त्यांची कागदपत्रे कुठून आणणार. जर ते तुमच्याकडून ५० वर्षांपूर्वीचे सर्टीफिकेट मागत असतील तर अगोदर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सीएएसाठी अर्ज करायला सांगा. तुम्ही अर्ज का करत नाही? कारण तसे केल्यामुळे तुम्ही परदेशी नागरिक ठराल. जर ते स्वत: अर्ज करत नसतील तर तुम्ही का अर्ज करत आहात असा सवाल ममतांनी उपस्थितांना केला.
#WATCH | North 24 Parganas, Bangaon: West Bengal Chief Minister Mamata Banerjee says, “… This is a terrible conspiracy (CAA-NRC). Another conspiracy has been hatched and that is the Uniform Civil Code (UCC), in which minorities, SC-ST, OBC, and tribals will have no existence,… pic.twitter.com/Kld6tkwOit
— ANI (@ANI) May 13, 2024
सीएए आणि एनआरसी हा भयंकर कट आहेच, त्याशिवाय आणखी एक समान नागरी कायद्याचा कट रचला गेला आहे. त्यात अल्पसंख्यक, एससी- एसटी, ओबीसी आणि आदिवासींचे कोणतेही अस्तित्व राहणार नसल्याचा दावा ममतांनी केला. हिंदुंचेही अस्तित्व राहणार नाही आणि केवळ एक देश, एक राजकीय पक्षाचा नेता राहील.
मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशाचे संविधान समाप्त करतील. देशाचा इतिहास आणि भूगोलही ते बदलतील. चार टप्प्यांतील मतदानाच्या आकडेवारीवरून आमच्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीला १९०-१९५ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला ३१५ जागा मिळतील. त्यामुळे मोदी येणार नाहीत असेही त्यांनी नमूद केले.





