सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण

मुंबई – सुप्रसिद्ध पार्श्वगायक पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण झाली असून, त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतः बालसुब्रमण्यम यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.

यावेळी ते म्हणाले कि, ‘गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी करोना चाचणी करून घेतली. तेव्हा माझा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे’.

Posted by S. P. Balasubrahmanyam on Tuesday, 4 August 2020

तसेच या व्हिडिओत बालसुब्रमण्यम यांनी आपल्या चाहत्यांना आरोग्याविषयी चिंता न करण्याचं आवाहन देखील केलं आहे.

आवाजाचा जादूगार असलेले एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आजवर हिंदी, दाक्षिणात्य अश्या अनेक भाषांमध्ये जवळपास ४०,००० गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.